या सारखे अनेक बालनाटक एका पाठोपाठ माता अनुसया प्रॉडक्शन मार्फत प्रविणकुमार भारदे सर आणि आमच्या छोट्या बालकलाकार विद्यार्थीनी मिळून रंगभूमीवर गाजवली.
संस्था मुलानं मधिल कौशल्य आणि आत्मविशास वाढवण्यासाठी पुढील प्रमाणे काम करते.
शिबिरांमधे मुलांची तयारी करून घेतली जाते. वेगवेगळ्या विषयांवर मान्यवरांचे तसेच स्वतः प्रवीणकुमार भारदे सरांचे मार्गदर्शन मुलांना मिळते .
प्रत्येकाला एकपात्री अभिनय स्किट देऊन त्याची तयारी
करून घेतली जाते . सादर नाट्यप्रवेश शाळा , कार्यक्रम ,सोसायटी फंकशन मध्ये , ऑडिशनमध्ये आपली कला दाखविण्यासाठी उपयोगी पडतो .
शिबरानंतर मुलांची बालनाट्ये बसवून त्याचे प्रयोग नाट्यमंदिरमध्ये केले जातात. स्टेज अनुभव मुलांना बालपण्यात मिळाल्यास मुलांच्या मनातील स्टेज भीती निघुन गेल्यास मुले पुढे धीट , आत्मविश्वासाने सामोरी जातील. ह्या कार्यक्रमामुळे मुलांमध्ये चांगला बदल पाहावयास मिळतो.