१९ वर्षे कार्यरत संस्था

२४०० हून अधिक नाट्य प्रयोग सादर

   माता अनुसया कला मंच या संस्थेने केलेली उल्लेखनीय प्रगती अभिनंदनीय आहे. फक्त दिवाळी, नाताळ, उन्हाळी सुट्टी इतक्या कमी कालावधीत गेल्या १८ वर्षात २४०० नाट्यप्रयोगांची उत्तुंग भरारी मारुन सदर प्रयोग शिवाजी मंदीर (दादर),दिनानाथ मंगेशकर (पार्ले), प्रबोधनकार ठाकरे (बोरीवली), गडकरी रंगायतन (ठाणे), साहित्य संघ (गिरगाव), विष्णुदास भावे (वाशी), कालीदास (मुलुंड), आचार्य अत्रे (कल्याण), सर्वेश हॉल (डोंबिवली), फाईन आर्ट (चेंबुर) इत्यादी. तसेच पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, आणि कोकणातील नाट्यमंदिरात झालेली आहेत.
   संस्थेने आजपर्यंत दहावेळा राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले आहे. कार्यशाळा/शिबिरातुन मुलांना आत्मविश्वास, स्टेज डेअरींग आवाज, उच्चार, मराठी भाषा, अभिनय, एकपात्री नाट्यप्रयोग इत्यादी गोष्टी शिकविल्या जातात. प्रत्येकाकडून तयारी करून घेतली जाते. वेगवेगळ्या विषयांवर मान्यवरांचे तसेच स्वत: प्रविणकुमार भारदे यांचे मार्गदर्शन मुलांना मिळते. शिबिरानंतर मुलांची बालनाट्ये बसवून त्याचे प्रयोग नाट्यमंदिरामध्ये केले जातात. सदर शिबिरातून मुलांमध्ये चांगला बदल पहावयास मिळतो.

अर्णव कालकुंद्री माता अनुसया चा विध्यार्थी चला हवा येऊ द्या च्या स्टेजवर

प्रवीणकुमार भारदे


( लेखक - दिग्दर्शक - निर्मता - कलाकार आणि संस्थापक माता अनुसय प्रॉडक्शन )

+

बालनाट्य


लेखक - दिग्दर्शक - निर्मिती

+

व्यावसायिक नाटक


लेखक - दिग्दर्शक - निर्मिती

विद्यार्थींना प्रशिक्षण


१७ वर्षाच्या कालावधीत

हून अधिक वर्षे


रंगभूमी , टीव्ही , चित्रपट क्षेत्रात

  • sample
  • sample2
  • sample3